Type Here to Get Search Results !

तालुक्यातील...त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बावीस महिन्यापासून थकीत वेतन फरकास न मिळाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन

तालुक्यातील...त्या  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बावीस महिन्यापासून थकीत वेतन फरकास न मिळाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन 
फोटो ओळ :- 22 महिन्यापासूनचे थकीत वेतन फरकास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळावे या मागणीचे निवेदन देताना ग्रामपंचायत पदाधिकारी शिष्ट मंडळ.
मोरगाव ! ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बावीस महिन्यापासून थकीत वेतन फरकास मिळावे अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन :- ज्ञानोबा घोणे. 

मोरगाव :- शासनाच्या ऊर्जा व कामगार विभागाने लागू केलेले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुधारित किमान वेतन गेल्या 22 महिन्यापासून शासकीय लालफितीत अडकून पडले आहे. या थकीत किमान वेतनाची मागील फरकासह तातडणे अंमलबजावणी करावी अशी मागणी पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. थकबाकीच्या फरकाचे रक्कम न मिळाल्यास संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा संघटनेचे सरचिटणीस ज्ञानोबा घोणे यांनी इशारा दिला आहे.
महाराष्ट्र शासनाने डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून दिनांक 10 एप्रिल 2020 रोजी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेतन दर लागू केला आहे. यामध्ये ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत इंची परिमंडल एक, दोन, तीन अशी विभागणी करून कुशल, कुशल,अर्धकुशल असे कर्मचाऱ्यांची वर्गवारी करीत हे वेतन देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु हे सुधारित के मन वेतन देण्यास पुणे जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. शासनाच्या ऊर्जा व कामगार विभागाने लेखी परिपत्रक देऊनही तब्बल गेल्या 22 महिन्यापासून गाव पातळीवरील ग्रामपंचायत मध्ये या वेतनाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे असंख्य कर्मचाऱ्यांना वेतनावर काम करावे लागत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
ऊर्जा व कामगार विभागाने लेखी आदेश देऊन तब्बल 22 महिने लोटल्यानंतरही अद्याप कर्मचाऱ्यांच्या हाती हे वेतन मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकताच 22 जून 2000 22 रोजी याच वेतनाचे नवीन परिपत्रक काढले आहे. पहिल्या परिपत्रकानंतर अद्याप हत्ती सुधारित वेतन मिळाले नसल्याने दुसऱ्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानंतर तरी आम्हाला वेतन मिळेल का असा प्रश्न ग्रामपंचायत कर्मचारी विचारत आहेत. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनाचा गंभीर प्रश्न विचारात घेऊन संघटनेचे सरचिटणीस ज्ञानोबा गोणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांची नुकतीच भेट घेऊन 10 ऑगस्ट 2020 च्या वेतनाचा फरक मिळावा अशी मागणी केली.
मागील 22 महिन्याचा थकबाकीसह फरक कर्मचाऱ्यांना मिळावा अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शंकरराव वावळ यांनी यावेळी दिला. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना अशा लेखी सूचना करून लवकरात लवकर सुधारित किमान वेतन कर्मचाऱ्यांना दिले जाईल असे आश्वासन यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी शिष्टमंडळास दिले यावेळी संघटनेचे संस्थापक सरचिटणीस ज्ञानोबा घोणे, उपाध्यक्ष अर्जुन रांजणे, प्रसिद्धीप्रमुख राहुल तावरे, इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश राऊत, पदाधिकारी विलास मोरे, रोहिदास सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

फोटो ओळ :- 22 महिन्यापासूनचे थकीत वेतन फरकास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळावे या मागणीचे निवेदन देताना ग्रामपंचायत पदाधिकारी शिष्ट मंडळ.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test