अनुसूचित जाती कल्याण समितीच्या दौऱ्यास सुरूवात
पुणे - अनुसूचित जाती कल्याण समितीने पुणे जिल्हा दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका प्रशासन, जिल्हा परिषद आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा आढावा घेतला.
समिती प्रमुख कु.प्रणिती शिंदे यांच्यासह आमदार यशवंत माने, लहू कानडे, राजेश राठोड, किरण लहामटे लखन मलिक, अरुण लाड, राजू आवळे, सुनील कांबळे, नामदेव ससाणे आणि टेकचंद सावरकर या समिती सदस्यांनी अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष, मागासवर्गीयांसबंधी राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबत माहिती घेतली.
विभागीय आयुक्त सौरभ राव आणि अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी समितीच्या सदस्यांचे विधानभवन येथे स्वागत केले. समिती गुरुवार आणि शुक्रवारी विविध विभागांचा आढावा घेणार असून विविध ठिकाणी भेटीदेखील देणार आहे.