वाठार स्टेशन पोलिसांची मोठी कारवाई;जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस,१० लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा - वाठार पोलिस स्टेशन हद्दीतील चोर्या उघडकीस आणण्यासाठी वाठार पोलिसांनी कसून तपास करून दहा लाखांचा मुद्देमाल व तीन संशयितांना जेरबंद केले वाठार पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १२ जून रोजी रात्रीच्या दोनच्या सुमारास हासेवाडी येथून निळा रंगाचा फोर्स ट्रॅक्टर चोरीला गेला होता.या घटनेची फिर्याद वाठार पोलिस ठाण्यात नोंद होती.त्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हाचा तपासाची सुत्रे हलवत चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरच्या ठिकाणापासून ललगुण,डिस्कळ, पुसेगाव,फलटण, शिंगणापूर,दहिवडी परीसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व संशयितांच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे व मिळालेल्या माहितीद्वारे वाठार पोलिसांना तीन संशयितांनपर्यंत पोहचता आले.संशियतांना अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेला फोर्स ट्रक्टर व मोटर सायकल तसेच चोरून आणलेली इरतिका कार जप्त केली.एकून १० लाखांचा मुद्देमाल जप्त करून वाठार पोलिस ठाण्यात जमा केला.संशयितांनी विविध गुन्हे केलेल्याची कबुली दिली.त्यामध्ये एक वर्षापूर्वी चोरलेली इरटिका कार व मोटारसायकलचा समावेश आहे.या चोरून आणलेल्या कारचा वापर ते चोरीसाठी करत होते.बनावट नंबर लावून ते त्या कारचा वापर करत असत.संशियतांकडून दहिवडी फलटण शहर, ग्रामीण या परीसरात मोटारसायकल चोरी केल्याचा संशय असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.ही कारवाई पोलिस उप अधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले, पोलिस उपनिरीक्षक संदिप बनकर, सहाय्यक फौजदार भोसले, हवालदार केंजळे, पोलिस नाईक तुषार आडके, गणेश ईथापे यांनी केली.