Type Here to Get Search Results !

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा संपन्न.

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा संपन्न.
मोरगाव प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा नुकताच मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला. तरडोली येथील निसर्ग संगीत पर्यटन केंद्रात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आनंद मेळाव्याचा मनमुराद आनंद लुटला.
पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या बारामती तालुका कार्यकारिणीचे वतीने तरडोली तालुका बारामती येथील निसर्ग संगीत पर्यटन केंद्र याठिकाणी नुकताच हा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नौकाविहार रेन डान्स घसरगुंडी झोका खेळणे आधी खेळाचा आनंद लुटला तसेच विविध वृक्षांची माहिती घेतली.  फोटो काढून आनंद व्यक्त केला. या मेळाव्याप्रसंगी संघटनेचे संस्थापक सरचिटणीस ज्ञानोबा घोणे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेत भविष्य निर्वाह निधी किमान वेतन राहणीमान भत्ता आदी महत्त्वपूर्ण विषयावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. 
तसेच तालुकाध्यक्ष शहाबुद्दीन तांबोळी यांनी भविष्यात बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडवणुकीसाठी विशेष ठरवून कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष मारुती खोमणे सचिव संजय ढवळे पाटील संघटक पिंटू सावंत प्रसिद्धीप्रमुख राहुल तावरे कर्मचारी छगन लांडगे मयूर शेडगे अमोल पारसे दादा पारसे दत्ता नलावडे समीर माळशिकारे दीपक पोंद्कुले आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ज्यावेळी निसर्ग संगीत पर्यटन केंद्राच्या संचालिका पत्रकार संगिताताई भापकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धीप्रमुख राहुल तावरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आंबेगाव चे कर्मचारी अनिल गार्डी यांनी केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test