पुरंदर प्रतिनिधी - वाल्हे ( ता. पुरंदर) येथील महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाच्या गुरुकुलास कै.सुधाकर दगडू भुजबळ यांच्या स्मरणार्थ भुजबळ परिवाराकडून स्वयंपाकाची भांडी समर्पित करण्यात आली आहेत.
या साहित्य सामुग्रीमध्ये स्वयंपाकाचे मोठे टोप ,कढई,बादल्या, घमेली यांसह इतर गरजेच्या वस्तूंचा देखील समावेश आहे.
यावेळी महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे संस्थापकीय अध्यक्ष ह भ प अशोक महाराज पवार सचिव संदीप महाराज दुर्गाडे यांसह संचालक मंडळाने प्रवीण भुजबळ परिवाराचे आभार व्यक्त केले.