Type Here to Get Search Results !

बारामतीत प्रशासकीय चषक स्पर्धेचे आयोज

बारामतीत प्रशासकीय चषक स्पर्धेचे आयोजन

            
बारामती : बारामती येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी  प्रशासकीय चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी दिली आहे. 

दिनांक २४ व २५ जून रोजी सकाळी ९ वाजता   डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती येथे क्रिकेट स्पर्धा व जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. 

मागील गेल्या दोन वर्षांत विविध शासकीय  आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना संसर्गाच्या उपाय योजना करण्यासाठी सेवा दिलेल्या आहेत. त्यांची शारीरिक  व मानसिक क्षमता सक्षम बनवण्यासाठी, आरोग्याच्या  दृष्टीकोनातून, थकवा व ताण नाहीसा करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन महत्त्वाचे ठरणार आहे. 

स्पर्धेतील विजेत्यांना फिरता चषक प्रदान करण्यात येणार आहे.  सर्व शासकीय विभागांनी क्रिकेट व व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता गणवेशानुसार संघ तयार करून तशी माहिती जिल्हा क्रीडा संकुल समिती, बारामती यांना तात्काळ  कळविण्यात यावी, असे आवाहन तालुका क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
                               

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test