Type Here to Get Search Results !

अतिक्रमणातून निघालेले भंगार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बेकायदेशीरपणे विकले - हर्षवर्धन शेळके-पाटीलमुख्याधिकारी नाॅट रिचेबल.

अतिक्रमणातून निघालेले भंगार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बेकायदेशीरपणे विकले - हर्षवर्धन शेळके-पाटील
मुख्याधिकारी नाॅट रिचेबल.

लोणंद, प्रतिनिधी दिलीप वाघमारे

लोणंद नगरपंचायत आणि प्रशासनाकडून दोन दिवस चाललेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेतून शिरवळरोड चौकातील राजीव गांधी शॉपिंग सेंटर च्या १७ गाळ्यांचे निघालेले लोखंड व पत्रा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी परस्पर संगनमत करून विकल्याचा आरोप हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी केला आहे.

लोणंद नगरपंचायतच्या पटांगणात ग्रामपंचायत अस्तित्वात असताना छोट्या व्यवसायीकांसाठी उभारण्यात आलेले "राजीव गांधी शॉपिंग सेंटर " हे पत्र्याचे गाळे काही वर्षांपूर्वी शिरवळरोड चौक येथे हलवण्यात आले होते. या ठिकाणच्या सुमारे १७ गाळ्यात छोटे व्यवसायीक व्यवसाय करत होते. मात्र पालखीसोहळ्याचे कारण दाखवत प्रशासनाकडून कालच कोणतीही नोटीस न देता दि.२१ रोजी या १७ गाळ्यांवर जेसीबी चालवून ते उध्वस्त करण्यात आले होते. या सतरा गाळ्यांचे निघालेले लाखो रूपयांचे भंगार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी परस्पर निलाव करून हडपल्याचा आरोप लोणंद येथील युवानेते हर्षवर्धन आनंदराव शेळके यांनी केला आहे.

आज सत्तारूढ नगरपंचायत बॉडीने घाईगडबडीने नगरपंचायत सभागृहात भंगार व्यावसायिकांची बैठक लावून माजी उपनगराध्यक्षाला अतीशय अल्प दरात १७ गाळ्यांचे पत्रे व लोखंडी चॅनेलच्या भंगाराचे टेंडर दिले , सदर प्रकार त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका भंगार व्यावसायिकाने सांगितल्यानंतर संबंधित कर्मचारी यांना हर्षवर्धन शेळके यांनी फोन लावून विचारले असता आम्ही कोणाही कर्मचाऱ्यांनी निलाव केला नाही, निलाव करण्यासाठी फक्त राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते असे सांगून हात झटकले तर मुख्याधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनीही फोन घेतला नसल्याचा आरोप हर्षवर्धन शेळके यांनी केला आहे.

याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात सपोनि विशाल वायकर यांना या संदर्भात सांगितल्यानंतर तातडीने भंगाराने भरलेले ट्रक नगरपंचायत समोर आणून लावण्यात आले. 

यावेळेस हर्षवर्धन आनंदराव शेळके यांच्यासोबत युवानेते संदिप शेळके, माहीती अधिकार कार्यकर्ते सत्वशील शेळके , बाळासाहेब शेळके ,सामाजिक कार्यकर्ते कय्युमभाई मुल्ला, शिवसेना शहरप्रमुख सुनिल यादव आणि गाळा धारक व्यवसायीक उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test