Type Here to Get Search Results !

पुणे ! महाबीजचे प्रमाणित बियाणे अनुदानीत दरात उपलब्ध

पुणे ! महाबीजचे प्रमाणित बियाणे अनुदानीत दरात उपलब्ध

पुणे : शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे व १० वर्षाच्या आतील व १० वर्षावरील कडधान्य पिकांच्या नवीन वाणांचा शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे  या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य व गळीतधान्य पिका अंतर्गत भात, तूर, मूग, बाजरी व सोयाबीन या पिकांसाठी अनुदानीत दराने बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

महाबीज तसेच त्यांच्या अधिकृत विक्रेत्याकडे प्रत्येक तालुक्यात भात, तूर, मूग, बाजरी व सोयाबीन या पिकांचे प्रमाणित बियाणे परमीटद्वारे उपलब्ध आहे. अनुदानीत दराने उपलब्ध प्रमाणित बियाण्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

पिके (कंसात वाण) वजन आणि अनुदानित विक्री दर पुढीलप्रमाणे :
भात (को ५१)- २५ किलो – अनुदानित विक्री दर ४२५ रुपये, भात (इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती)- २५ किलो- अनुदानित विक्री दर ९५० रुपये. तूर (राजेश्वरी, बीडीएन ७१६, बीडीएन ७११)- २ किलो- अनुदानित विक्री दर १८० रुपये, तूर (‘आय सी पी एल ८८६३ आशा’)- २ किलो- अनुदानित विक्री दर २०० रुपये.
मूग (उत्कर्षा, बी एम २००३-२)- २ किलो पॅकिंग- २१० रुपये, मूग (बी एम २००२-१)- २ किलो- अनुदानित विक्री दर २४० रुपये. बाजरी (धनशक्ती)- १०५ किलो- अनुदानित विक्री दर २२.५० रुपये.
सोयाबीन (फुले किमया, फुले संगम, एम ए सी एस ११८८)- ३० किलो- अनुदानित विक्री दर  ३ हजार रुपये.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test