सोने दोन हजारांनी महाग होणार - किरण आळंदीकर (राज्य समन्वयक इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन ली.)
बारामती - केंद्र सरकारने सोन्याच्या आयतशुल्क मध्ये 5% ने वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने सोन्यामध्ये आज पासून च भाववाढ होऊ शकते अशी माहिती इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन ली. चे राज्य समन्वयक किरण आळंदीकर यांनी दिली. या आधी सोन्यावर 7:5 % आयतशुल्क होते त्यामध्ये वाढ होऊन आता 12:5 % होईल याशिवाय 2:5 % सेस आणि त्यावर 3% जी. एस. टी. मिळून आयात शुल्क एकूण 15:7 % होईल. 5 % आयातशुल्क वाढीमुळे सोन्यामध्ये 2500 रु.तोळ्याला भाववाढ होते परंतु या पूर्वी सोन्यावर 0:75 % सोशल वेलफेअर सरचार्ज होता तो काढून टाकण्यात आल्यामुळे 2000 रु. वाढ निश्चित असल्याचे किरण आळंदीकर यांनी सांगितले.
मात्र चांदी वर कोणत्याही शुल्का मध्ये वाढ नसल्याने चांदीच्या भावावर याचा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.पूर्वी ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये असा समज असायचा आणि अद्याप हि आहे की आषाढ - श्रावण महिन्यामध्ये सोन्याचे भाव कमी होतात कारण या महिन्यामध्ये लग्नसराई वगैरे नसते परंतु असं काही नसून सोन्याचे बाजार भाव हे आंतरराष्ट्रीय घडामोडीवर, भौगोलिक परिस्थितीवर आणि मागणीवर अवलंबून असल्याचे आळंदीकर यांनी सांगितले.