इंदापूर ! विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात जागतिक योग व संगीत दिन साजरा
इंदापूर - इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कळबं ता.इंदापूर येथे शारीरिक शिक्षण विभाग ,राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी सशक्त , लवचिक निरोगी शरीर आणि उत्साही मन यांच्यासाठी नित्य योगासने व संगीत यांच्या माध्यमातून शरीर व मन प्रसन्न ठेवता येत असल्याचे सांगितले. जागतिक योग दिन व संगीत दिन साजरा करीत असताना कुटुंबात निरामय वातावरण राहणेसाठी योग प्राणायाम तसेच मेंदू , ह्रदय , मानसिक संतुलन, उच्च रक्तदाब , फिटनेस,शांत ,प्रसन्न मनासाठी सुमधुर संगीत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. जांब ता इंदापूर येथील कुमारी प्रतीक्षा सुनील पाटील यांनी योग प्रकार यांची माहिती देवून वज्रासन, अर्धचंद्रासन, गोमुखासन, सुखासन, ताडासन इ.योगासने प्रात्यक्षिके सादर केली. प्रतीक्षा पाटील हिने अधोमुख श्वानासन आसन प्रकारात वर्ल्ड गिनिज बुक रेकॉर्ड ७५ मिनिटे ४४ सेकंद असा विश्वविक्रम केला त्याबद्दल संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते पाटील हिचा सन्मान करण्यात आला.शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुहास भैरट यांनी व्यायामाचे महत्त्व सांगून वार्म अप व ताडासन, त्रिकोणासन इ योगाचे प्रकार यांची प्रात्यक्षिके सादर केली. प्रा ज्ञानेश्वर गुळीग यांनी जागतिक संगीत दिनाचे महत्त्व विषद करून एरोबिक्स प्रात्यक्षिके सादर केली.योग दिनानिमित्त उपस्थित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, उपप्राचार्य डॉ. अरुण कांबळे,विज्ञान शाखा प्रमुख तेजश्री कोकाटे, क्रीडा विभाग प्रमुख सुहास भैरट, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ रामचंद्र पाखरे, प्राध्यापक ज्योत्स्ना गायकवाड , विद्यार्थी कल्याण अधिकारी राजेंद्रकुमार डांगे प्रा. डॉ विलास बुवा , प्रा डॉ विजय केसकर, प्रा प्रशांत शिंदे , प्रा. रविराज शिंदे ,ग्रंथपाल विनायक शिंदे इ प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.