Type Here to Get Search Results !

संत ज्ञानेश्वर यांच्या ७२५ व्या समाधी संजीवन वर्षानिमित्त व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्त ज्ञानियाचा राजा या अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात संपन्न

संत ज्ञानेश्वर यांच्या ७२५ व्या समाधी संजीवन वर्षानिमित्त व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्त  ज्ञानियाचा राजा या अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात संपन्न
------------------------------------------------------------
आळंदी, दि. १९ जुन : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संत ज्ञानेश्वर यांच्या ७२५ व्या संपन्न झालेल्या समाधी संजीवन वर्षाचे औचित्य साधून व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्त आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे  शनिवार व रविवार दिनांक १८ व १९ जून रोजी *ज्ञानियाचा राजा* या अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे ज्ञानोबा तुकाराम पारितोषिक विजेते व वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ साधक प्रिय अध्यापक श्री मारुती बाबा कुर्हेकर यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन झाले.
        सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या समाधी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारीत ज्ञानियांचा राजा या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १८ व १९ जून २०२२ या कालावधीत आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे करण्यात आलेला होता. 
       शनिवार दिनांक १८ जून रोजी दुपारी ४ वाजता हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संत निवृत्ती, संत सोपान व संत मुक्ताई यांच्या जीवनावर आधारीत व्याख्यान श्री निरंजन नाथजी यांनी सादर केले. ह.भ.प.श्री. अक्षय महाराज भोसले यांनी किर्तन सादर केले . याच दिवशी रात्रौ ८ वाजता भारुड, अभंगगीत, भक्तीगीत इ. भक्तीसंगीताचा कार्यक्रम  सुप्रसिद्ध संगीतकार गायक कल्याणजी गायकवाड, प्रसिद्ध कलाकार कार्तिकी गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड यांनी भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर केला.
        रविवार दिनांक १९ जून रोजी दुपारी ४ वाजता हरिपाठ कार्यक्रम झाली.  श्री स्वामीराज भिसे महाराज यांचे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान सादर केले. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडावर आधारीत समर्थ पाटील व त्यांच्या समूहाने भजन विराणी सादर केली. तर ह.भ.प.श्री. प्रमोद महाराज जगताप हे कीर्तन सादर केले असून ज्ञानेश्वर माऊलींच्या काव्यावर आधारीत ओडिसी नृत्य श्रीमती शुभदा वराडकर आणि सहकारी सादर केले तसेच भूपाळी ते भैरवी कलामंच ही संस्था गण, गौळण, नमन, भूपाळी, ओवी, वासुदेव, दिंडी, कीर्तन, भारुड, पसायदान इ.  दर्जेदार कार्यक्रम सादर केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test