Type Here to Get Search Results !

भुयारी मार्गासाठी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा

भुयारी मार्गासाठी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा 
लोणंद - पुणे-मिरज दरम्यान असणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावर ( Central Railway) वाढलेल्या वाहतूकीमुळे लोणंद येथील रेल्वेमार्गाच्या पुर्वेस असणाऱ्या शाळा - काॅलेजच्या (School-College) विद्यार्थ्यांसह पुर्वेस असणाऱ्या नवीन वसाहतीतील नागरिकांना येण्याजाण्यासाठी भुयारी मार्ग (Underpass ) करण्यात यावा यासाठी लोणंद नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील व सहकाऱ्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळेस लोणंद रेल्वे प्रवासी संघटनेकडून जुन्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे, प्लॅटफॉर्म वरील प्रसाधनगृह स्वच्छ व वापरण्यायोग्य स्थितीत ठेवणे, दिव्यांगासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच तिकीट खिडकी व चौकशी यासाठी वेगवेगळ्या खिडक्या करणे, प्लॅटफॉर्मवरील शेडची लांबी वाढवणे, वाय-फाय, सीसीटीव्ही,  हायमास्ट लाईट ची सोय करणे आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन रेल्वेच्या पॅसेंजर कमिटीचे चेअरमन यांना देण्यासाठी लोणंद येथील रेल्वे अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.


यावेळी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील यांच्यासह नगरसेवक गणीभाई कच्छी, प्रदीप क्षीरसागर, व्यंकटेश हेब्बार, प्रसन्न शहा, सुनील यादव, सुनील रासकर ,सुनील शहा, राजेश भाटिया, रोहित अग्रवाल, मनोज बारटक्के , गोविंद धामणकर , म्हस्कूआण्णा शेळके, जमीर शेख, गिरीश रावळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test