Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! सोमेश्वरच्या आजी-आजी सैनिक संघाच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब गायकवाड व नितीन शेंडकर तर उपाध्यक्ष पदी भगवान माळशिकारे व रामचंद्र शेलार यांची निवड

सोमेश्वरनगर ! सोमेश्वरच्या आजी-आजी सैनिक संघाच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब गायकवाड व नितीन शेंडकर तर उपाध्यक्ष पदी भगवान माळशिकारे व रामचंद्र शेलार यांची निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ सोमेश्वर च्या उपाध्यक्ष पदी भगवान माळशिकारे , व रामचंद्र शेलार यांची निवड झाली आहे तर कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब गायकवाड व नितीन शेंडकर यांची निवड करणेत आली संघाची  नवीन कार्यकारिणी ची निवड नुकतीच करणेत आली .
     संघटनेचे संस्थापक माजी सैनिक व आंतरराष्ट्रीय धावपटू जगन्नाथ लकडे यांच्या अध्यक्षतेखाली, तक्रार निवारण समिती अध्यक्ष.ॲड. गणेश आळंदीकर व संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर व  सदस्यांच्या उपस्थितीत रविवारी करंजेपुल येथील कार्यालयात बैठक पार पडली त्यामधे पुढील कार्यकाळासाठी पदाधिकारी यांच्या निवडी झाल्या .
कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड व नितीन शेंडकर ,सचीव पदी रामदास कारंडे ,सह सचीव पदी धनराज कांबळे,उपाध्यक्षपदी भगवान माळशिकारे,        (कोऱ्हाळे)) ,रामचंद्र शेलार ,माळेगाव खजिनदार पदी किरण सोरटे ,सह खजिनदार रविंद्र कोरडे ,तसेच जेष्ठ माजी सैनिक राजाराम शेंडकर यांची सल्लागार सदस्य पदी निवड झाली .
  या सैनिक संघटनेद्वारे सुमारे १५० पेक्षा अधिक दिवाणी ,फौजदारी व किरकोळ स्वरुपाचे,रस्त्याचे   वाद पोलीस स्टेशन व कोर्टात जाण्यापूर्वी मिटवले आहेत. याशिवाय कोरोनाच्या काळात गरीब नागरीक,परप्रांतीय व मजुर वर्गाना दोन वर्ष सुमारे ७०० किटचे वाटप ,सन २०१९ मधे सैनिक टाकळी पुरग्रस्ताना ट्रक भरुन जिवनावश्यक वस्तु तेथे जावुन मदत ,याशिवाय महाबळेश्वर येथील  दरडग्रस्तगावाना मदत व रक्तदानासारखे उपक्रम राबविले जातात. राज्यस्तरीय मॅरेथॉन ,पोलीसभरती  प्रशिक्षणासाठी तरुणाना मदत असे उपक्रम  राबविले आहेत व करीत आहेत .निवड झालेल्या सर्व पदाधिकारी वर्गाचा सत्कार करणेत आला .निवडीनंतर सर्व पदाधिकारी वर्गाने ईथुन पुढच्या काळात देखील सामाजीक उपक्रमात वाढ करणेत येईल असे सांगीतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test