Type Here to Get Search Results !

शेतकरी उत्पादक कंपनी मुळे शेतकऱ्यांचा विकास होणे शक्य – सारंगधर निर्मळकृषी प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कांदा खरेदी व साठवणूक विभागाचा शुभारंभ संपन्न

शेतकरी उत्पादक कंपनी मुळे शेतकऱ्यांचा विकास होणे शक्य –  सारंगधर निर्मळ
कृषी प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कांदा खरेदी व साठवणूक विभागाचा शुभारंभ संपन्न
श्रीरामपूर - नांदूर येथे २९ मे २०२२ रोजी कृषी प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कांदा खरेदी व साठवणूक विभागाचा शुभारंभ प्रभात उद्योग समूह व किसानकनेक्टचे चेअरमन सारंगधर निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आला. कृषी प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनीची सुरुवात ऑकटोबर २०२० मध्ये करण्यात आलेली असून सदर कृषी प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनीचे ३५० शेतकरी सभासद आहेत. तसेच संचालक मंडळात किशोर ढोकचौळे, समीर बोर्डे, विशाल शेडगे,विश्वजित सिंग, रोहिणी ढोकचौळे, पूनम विघावे, यांचा समावेश आहे. कंपनी सुरु झाल्यापासून त्यांनी सोयाबीन, मका, कापूस, पशुखाद्य, कांदा यामध्ये उलाढाल करत आहे. उद्घाटन केलेल्या साठवणूक केंद्रात लवकरच नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याची सुरुवात करणार असल्याची माहिती कृषी प्लस फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक किशोर ढोकचौळे यांनी प्रास्तविक करताना दिली.
उद्घाटनप्रसंगी सारंगधर निर्मळ यांनी लॉकडाऊन सारख्या महामारीच्या कार्यकाळात सुरु करण्यात आलेल्या या कृषी प्लस उद्योग समूहाचे कौतुक केले. तसेच त्यांनी सुरु केलेले कांदा खरेदी व साठवण केंद्रांचे फीत कापून उद्घाटन केले. कार्यक्रम प्रसंगी बोलतांना ते म्हणाले कि, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे कार्य बघता शेतकऱ्यांचा विकास होणे शक्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. लॉकडाऊन सारख्या कार्य काळात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे योगदान दिलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रम प्रसंगी कोपरगाव येथील चौरंगीनाथ ॲग्रो कंपनीचे चेअरमन आयुब शेख, निर्मळ महिला नागरी सहकारी संस्थेच्या चेअरमन निशाताई निर्मळ, अरविंद निर्मळ, नांदूर ग्रामपंचायत सरपंच विशाल गोरे, सनफ्रेश ॲग्रो कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोल आरंगळे, गंगागिरी ॲग्रोचे संचालक मंगेश खरपास, पुरुषोत्तम गोरे, ज्ञानेश्वर सोडणार, गजानन ढोकचौळे, संतोष ढोकचौळे, भारत ढोकचौळे, मच्छिंद्र सैद,द्वारकानाथ गुजर, विलास शेडगे, अरुण गाडे, कैलास येवले, बाबासाहेब वाकचौरे, राहुल निर्मळ, गणेश यादव, प्रवीण गोरे, नारायण गोरे, संजय जगताप, विजय ढोकचौळे, शंकर ढोकचौळे, साहेबराव घोरपडे, संजय यादव, बापुसाहेब चौधरी,उमेश शेडगे, निखील शेडगे, नितीन निबे, विजय निर्मळ, लतीश वेताळ, योगेश गायकवाड, संजय गलांडे, शिवाजीराव दळे, वसंत बेंद्रे, सदाशिव निबे, किरण घोरपडे, प्रकाश गोरे, ज्ञानदेव कडनोर, चांगदेव तावरे, गोविंद ढोकचौळे, गोपाल ढोकचौळे,राजाराम ढोकचौळे, शरद दाभाडे, सोमनाथ दाभाडे, प्रशांत कासार, बाळासाहेब शिंदे, भाऊसाहेब शिंदे, जालिंदर कोळसे, प्रदीप गायकर, रायभान बावके, गिरीष गोरे, राहुल विघावे, मनोज विघावे, रेहान सय्यद, महेश मगर, गणेश घोरपडे, ज्ञानेश्वर ढोक, संजय बनकर, शरद घोरपडे, राजू शिरसाठ, राजेंद्र गलांडे, तसेच सभासद व परिसरातील शेतकरी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालिका रोहिणी ढोकचौळे यांनी केले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test