अधिकारी महासंघाच्या पुणे समन्वय समितिच्या अध्यक्षपदी हिम्मत खराडे
पुणे दि.२०-महाराष्ट्र् राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पुणे समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांची सर्व संमतीने निवड करण्यात आली. राज्य सरचिटणिस इंजि. विनायक लहाडे , राज्य संघटक अशोक मोहिते, पुणे सरचिटणिस इंजि. विठ्ठल वाघमारे आणि कोषाध्यक्ष मोहन साळवी यांनी श्री.खराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पुणे समन्वय समितीचे अध्यक्ष भारत शेंडगे हे 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली आहे.