पुणे ! जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण
पुणे - जिल्हा न्यायालय परिसरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल दीपक कश्यप यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपणासाठी वैदेही दत्ताजी गायकवाड ट्रस्टचे माध्यमातून दत्ताजी गायकवाड आणि यशवंतराव खैरे यांनी रोपे उपलब्ध करून देण्यात सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश सर्वश्री एस.जे. भारुका, ए. टी. वानखेडे, के.पी. नांदेडकर, एस. जी. वेदपाठक, एस. आर. नांवदर, जे. एन. राजे, महिला न्यायीक अधिकारी एस. एस. पारखी, जे.बी. खटावकर, एम.एस. माळी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे उपस्थित होते.