पत्रकारांनी कायदा समजून घेणे तितकेच महत्वाचे-प्रदेश अध्यक्ष एम.एस.शेख
पुणे - सामाजिकदृष्ट्या पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनीही कायदा समजून घेणे तितकेच महत्वाचे असल्याचे मत भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम. एस. शेख यांनी व्यक्त केले.पुणे येथील तारांकित हॉटेलमध्ये भारतीय पत्रकार संघाच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात पार पडली .या बैठकीत पत्रकारांच्या हितासाठी राज्यात विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा देखील करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शेख हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले राज्यात अनेक ठिकाणी अदखलपात्र गुन्ह्याच्या नावाखाली प्रामाणिक पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जात आहे, परंतु अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्याहेतु प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी भारतीय पत्रकार संघ कायमच उभा आहे. त्यामुळे पत्रकारांनीही घाबरून न जाता कायदा कलम समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी अनेक नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांचा सन्मान एम. एस. शेख यांच्या हस्ते करण्यात आला असून पुणे जिल्ह्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे यांचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले.
या प्रसंगी भारतीय पत्रकार संघाच्या महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा पल्लवी प्रकाशकर महाराष्ट्र प्रदेश लीगल विंगचे अध्यक्ष ऍड.कैलास पठारे पाटील तसेच पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष सिकंदर नदाफ महाराष्ट्र लीगल विंगचे उपाध्यक्ष ऍड. पांडुरंग ढोरे पाटील मुख्य सचिव ऍड. योगेश तुपे पाटील ऍड. कांताताई गोर्डे छाया गायकवाड पूनम शिंदे मयूर माळी शुभम माने आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांचे आभार गंधर्व कवडे पाटील यांनी मानले.