सोमेश्वरनगर ! प्रवेशोत्सवदिनी विद्यार्थ्यांचे औक्षण करत सनईच्या सुरात स्वागत ; विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाटप.
सोमेश्वरनगर - करोना महामारीमुळे गेली दोन वर्षे शाळेची अडखळत चालणारी गाडी नियमितपणे विनाअडथळा सुरू व्हावी, सर्व विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आणि बुध्दीसंपन्न हे शैक्षणिक वर्ष लाभो, अशा शुभेच्छा बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील उत्कर्ष माध्य आणि उच्च आश्रमशाळेच्या प्राचार्या श्रीम रोहिणी सावंत यांनी नवीन शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशोत्सवाच्या दिनी दिल्या. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांचे औक्षण करून सनईच्या सुरात स्वागत करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके देण्यात आली तसेच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मधुर व्हावी म्हणून जीलेबीचे वाटप करण्यात आले. प्राचार्या रोहिणी सावंत यांनी स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. हनुमंतराव सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर गायकवाड यांनी केले.