Type Here to Get Search Results !

सावित्री महिला प्रशिक्षण संस्था पिंपळीचे कार्य कौतुकास्पद: सुनेत्रा पवार

सावित्री महिला प्रशिक्षण संस्था पिंपळीचे कार्य कौतुकास्पद: सुनेत्रा पवार
बारामती -  पिंपळी ग्रामपंचायतीच्या वतीने पिंपळी-लिमटेक गावातील बचत गटातील महिला व ग्रामस्थ महिला आणि युवतींसाठी १५ वा वित्त आयोगातून व सावित्री महिला प्रशिक्षण संस्था पिंपळीच्या माध्यमातून सत्तावीस दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचा समारोप हायटेक टेक्‍स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्राचे प्राथनिधीक स्वरूपात वाटप करून करण्यात आले.
        पिंपळी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम हा पासून ९ मे पासून ते ४ जून पर्यंत २७ दिवसांचा घेण्यात आलाहोता. यामध्ये गावातील १२७ महिलांनी सहभाग नोंदवला त्यापैकी ११० महिलांनी परिपूर्ण असे प्रशिक्षण घेतले.
कार्यक्रमाचा शुभारंभ सावित्रीमाई फुले, जिजामाता व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करून करण्यात आला.
   याप्रसंगी बोलताना पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महिलांसाठी २७ दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम हा व्यावसायिक दृष्ट्या गरजेचा असून गरजू महिलांनी असे व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम आहे. असेच लोकोपयोगी उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविले जावेत तसेच प्रशिक्षित झालेल्या गरजू महिलांना हायटेक टेक्स्टाईल पार्कमध्ये पुनश्च एकदा प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.
  तसेच २७ दिवसांमध्ये महिलांना उत्कृष्ट रीतीने प्रशिक्षण दिल्याबद्दल सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा थोरात व उपाध्यक्ष पुनम थोरात यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
ट्रेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्राममपंचायतीच्या सदस्या अश्‍विनी बनसोडे यांनी विशेष प्रयत्न केले.
  पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेलरिंग प्रशिक्षण शिबिरात यशस्वीपणे प्रशिक्षण घेतलेल्या सर्व महिला लाभार्थींना बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी शुभेच्छा दिल्या.
    टेलरिंग प्रशिक्षण संदर्भातील सविस्तर माहिती ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी दिली.
      प्रशिक्षण घेतलेल्या सर्व महिलांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजनेतून शिलाई मशीन मिळवण्यासाठी अर्ज करावेत त्यांना शिलाई मशीन योजनेचा लाभ पात्रतेनुसार दिला जाईल. ट्रेलरिंग प्रशिक्षण हे व्यवसाय करण्याच्या दृष्टीने फायदेशीर असून महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपल्या उदरनिर्वाहाचे साधन वाढवावे असे मनोगत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागले यांनी व्यक्त केले.
    प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी केले. प्रास्ताविकात गाव विकासकामांचा आढावा संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी दिला व सूत्रसंचालन बाळासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार उपसरपंच आबासाहेब देवकते पाटील यांनी मानले.
   दरम्यान पिंपळी आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक यांचे इंद्रजित नानासाहेब घुले यांची सन २०२० मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेमध्ये राज्यात  ८२ वा व एनटीसी मध्ये ८ व्या.क्रमांकाने ऊत्तीर्ण झाल्याबद्दल पिंपळी ग्रामपंचायतीच्या वतीने सुनेत्रा पवार यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
    यावेळी हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल प्रमुख पाहुणे डॉ. तोरडे, ग्रामपंचायतीचे सरपंच मंगल केसकर उपसरपंच आबासाहेब देवकाते, बारामती तालुका राष्ट्रवादी सोशल मिडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल बनकर,अजित थोरात, सदस्या स्वाती ढवाण, अश्विनी बनसोडे, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, पोलीस पाटील मोहन बनकर, बारामती पंचायत समिती बचत गट प्रभाग समन्वयक शुभांगी सूर्यवंशी, ग्रामस्थ हरिभाऊ केसकर रामचंद्र बनकर, पप्पू टेंबरे, महेश चौधरी,तुळशीदास केसकर, रंगनाथ खोमणे, विजय बाबर,नवनाथ देवकाते, बापूराव केसकर,हनुमंत कुदळे, संदीप बनकर,दिपक देवकाते,रणजित देवकाते, ग्रामस्थ महिला दिपाली ढवाण पाटील,अंजना खोमणे,सुरेखा देवकाते,बेगम ईनामदार, सुरेखा थोरात, सानिया इनामदार,लता गायकवाड,आरती शिंदे,रेखा तांबे, रेश्मा रुपनवर, सारिका थोरात,अलका तांदळे, कोमल पवार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अनिल बनकर, प्रसन्ना थोरात,महादेव खोमणे,सतीश शिंदे, सोपान थोरात आदींसह बचत गटातील महिला,युवक,युवती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test