फलटण ! साखरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते दत्ता बोडरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा
फलटण प्रतिनिधी - साखरवाडी ग्रामपंचायत चे कर्मचारी व पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते दत्ता बोडरे यांचा ४३ वा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साखरवाडी विद्यालय साखरवाडी येथे वृक्षारोपण करून साजरा केला जेणे करून इतरही ग्रामस्थांनी आपला वाढदिवस पर्यावरणाचा समतोल बघता वृक्षारोपण करावे व ही काळाची गरज आहे हे वृक्षारोपण करून महत्व पटवून दिले या उपक्रमाचे साखरवाडी व परिसरातून सर्वच स्तरातून कौतुक होत आहे या वाढदिवसा दिनी युवकांची उपस्थिती लक्षणीय होती
या कार्यक्रमावेळी साखरवाडी गावचे लोकप्रिय सरपंच मा.विक्रमसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या वाढदिवसा निमित्त एक झाड लावावे हा मोलाचा संदेश देऊन त्याचे पालनही करावे असे मार्गदर्शन केले
यावेळी साखरवाडी ग्रामपंचायत चे उपसरपंच अक्षय रूपनवर,खामगाव चे माजी उपसरपंच बाळासाहेब कुचेकर,सुरेश बापू पवार, साखरवाडी विद्यालय चे राजेंद्र शेवाळे, संग्राम औचरे, प्रशांत रणवरे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दादा जाधव, डाॅ.आनंदा जाधव, अनिल कुरहाडे,मारुती नाना माडकर, अनिल चांदगुडे, संभाजी जाधव,जय बोडरे ,महेश बाबर, सुरज साळवे व इतर मान्यवर उपस्थित होते