Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! अवैध दारू विक्रेत्यास केले १ वर्षासाठी जेरबंद, एम.पी.डी.ए. कायद्यातंर्गत कारवाई

सोमेश्वरनगर ! अवैध दारू विक्रेत्यास केले १ वर्षासाठी जेरबंद, एम.पी.डी.ए. कायद्यातंर्गत कारवाई
सोमेश्वरनगर - बारामती उपविभागातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे हददीतील काही इसम अवैध दारूविकी करत असल्याने त्यांचे विरुद्ध दारुबंदी कायदयान्वये वेळोवेळी गुन्हे दाखल करून प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती,परंतु सदरची कायदेशीर कारवाई करुन देखील ते अवैध दारु विक्री बंद करत नसल्याने त्यांचे विरुद्ध प्रचलित कायदयाव्दारे कडक प्रतिबंधक कारवाई करणेचे आदेश अभिनव देशमुख सो.पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिलेले होते.वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक  सोमनाथ लांडे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे गुन्हे विषयक अभिलेखावरील मौजे निंबुत ता बारामती जि. पुणे येथे अवैध दारुव्रिकी करणारा
प्रकाश चैनसिंग नवले वय ५२ वर्ष यांचे विरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे सुमारे २५ दारुबंदी कायदयान्वये गुन्हे दाखल असलेने त्याचे एम. पी. डी. ए. कायदया अंतर्गत प्रस्ताव तयार करुन मंजुरी कामी मा.पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सो. पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर करणेत आलेला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन मा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सो. पुणे यांनी प्रकाश चैनसिंग नवले वय ५२ वर्ष रा. निंबुत ता. बारामती जि. पुणे यांस एम. पी. डी.ए कायदयान्वये १ वर्ष स्थानबध्द करणेचे आदेश दिलेने आज रोजी सदर अवैध दारुविक्रेता प्रकाश चैनसिंग नवले यांस वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेवुन त्यास येरवडा कारागृह पुणे येथे जमा करणेत आलेले आहे. बारामती उपविभागातील वारंवार अवैध हातभटट्रीची दारु विकणा-या एकुण २० इसमांवर एम.पी.डी.ए कायदयातर्गंत कारवाई करणेसाठी यादी बनविण्यात आलेली असुन एकुण १५० इतर अवैध दारु विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करणेत येणार असलेबाबत मा.गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी सांगितलेले आहे.सदरची कामगिरी ही मा. डॉ. अभिनव देशमुख सो पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलींद मोहीते सो अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, अशोक शेळके पोलीस निरीक्षक स्थागुशा पुणे ग्रामीण, यांचे मार्गदर्शनाखाली  सोमनाथ विष्णु लांडे सहा पोलीस निरीक्षक, पोसई .योगेश शेलार, पोसई सलीम शेख, स.फौ. जगताप, पो हवा / महेश बनकर, स्था. गु. शा, पुणे ग्रामीण तसेच वडगाव निंबाळकर पो स्टे चे पो हवा रमेश नागटिळक, दिपक वारुळे, पोलीस नाईक अमोल भोसले, नितीन बोराडे,पो. कॉ. महादेव साळुंके, पोपट नाळे, अमोल भुजबळ, म पो कॉ / प्राजक्ता जगताप यांचे पथकाने कामगिरी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test