इंदापुर - निमगाव केतकी या ठिकाणी असलेल्या धनगर समाज बांधव यांच्याकडून जाधव वीटभट्टी या ठिकाणी असलेल्या वीट भट्टी मजूर कामगार यांच्या मुलांना जयंतीनिमित्त खाऊ व शालेय साहित्य वाटप करून राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच व्याहाळी चौक या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर चौक असे एका चौकाला नाव देऊन नामकरण करण्यात आले आहे. सत्यशोधक प्रतिष्ठान निमगाव केतकी यांच्यावतीने देखील जयंतीनिमित्त श्री संत सावतामाळी चौक या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सत्यशोधक प्रतिष्ठान चे मार्गदर्शक डॉक्टर स्वप्नील देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय राऊत सर तसेच बापू चांदणे अडवोकेट श्रिकांत करे यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री देवराज भाऊ जाधव पतसंस्थेचे चेअरमन दशरथ तात्या डोंगर बहुजन मुक्ती पार्टी चे बाबासाहेब भोंग, बाबासाहेब पाटील, अॅड अनिल आबा पाटील, अॅड सचिन राऊत, पत्रकार निलेश भोंग, सत्यशोधक प्रतिष्ठानचे सचिव प्रवीण डोंगरे, सत्यशोधक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय मिसाळ सदस्य बजरंग जगताप, बंटी मिसाळ,व महादेव पाटील, बबन पाटील, विजय पाटील, हनुमंत पाटील, संजय पाटील, सुहास पाटील, आकाश पाटील, पंकज पाटील, कांता शेंडे, सोमा राऊत, प्रशांत बंडगर, बापू फुटाणे, दीपक शेंडे, मंगेश घाडगे, तुषार खराडे, दादा आदलिंग, अमीत पाटील पक्ष मित्र धनंजय राऊत व इतर ग्रामस्थ उपस्थित होते