जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त उत्कृष्ट पर्यटन केंद्र चालकांचा सत्कार
कृषी पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कृषी पर्यटन केंद्र चालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे बंदेवाडी येथील देवगिरी कृषी पर्यटन केंद्राचे सुखदेव शामराव गिरी, सातारा जिल्ह्यातील मौजे बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्राचे आनंदराव गणपत शिंदे, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या मौजे रामपूर येथील सावे कृषी पर्यटन केंद्राचे आदित्य प्रभाकर सावे, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या मौजे वळती येथील मामाचं वावर कृषी पर्यटन केंद्राचे मोहन जगताप, जळगाव जिल्ह्यातील अंजाळे येथील नंदग्राम गोधाम कृषी पर्यटन केंद्राचे अभिलाश संतोषकुमार नागला, वर्धा जिल्ह्यातील मौजे वालधूर येथील रानवारा कृषी, निसर्ग व ग्रामीण पर्यटन केंद्राचे राजेंद्र सोभागमलजी डागा, रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्राचे चंदन चंद्रशेखर भडसावळे, औरंगाबाद जिल्ह्यातील मौजे वडगाव येथील वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्राचे रवींद्र भीमराव पाटील तसेच औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील मिर्जापूर येथील सृष्टी कृषी पर्यटन केंद्राच्या प्रतिभा किरण सानप यांचा समावेश होता. महाराष्ट्रात कृषी पर्यटन संकल्पना रूजवणे, वाढवणे, प्रचार-प्रसार, क्षमता व कौशल्य, धोरणात्मक विकास करणे या विशेष योगदानासाठी बारामती येथील कृषी पर्यटन विकास संस्थेचे संचालक पांडुरंग भगवानराव तावरे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कृषी पर्यटन विकासाशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये पुरस्कार प्राप्त केंद्र संचालकांनी आपले अनुभव कथन केले. तर, या क्षेत्रातील संजय पवार, डॉ.रवी जायभाये, डॉ.साईनाथ हाडुळे, आनंद पेंडारकर, अविनाश जोगदंड, चंदन कस्तुरवार, डॉ.सौरभ कृष्णा, पालघर येथील पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.प्रशांत कांबळे, रूतुजा अचलारे सप्रे आदी तज्ज्ञांनी कृषी पर्यटन केंद्र चालकांना मार्गदर्शन केले.