Type Here to Get Search Results !

धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा - उपमुख्यमंत्री अजित पवार

धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा - उपमुख्यमंत्री अजित पवार
येवल्यात साकारणार शिवसृष्टी

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते,  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'शिवसृष्टी'चे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण

नाशिक  - महाराष्ट्र हे थोर समाजसुधारकांच्या विचार व कार्याची परंपरा लाभलेलं पुरोगामी राज्य आहे. इथं एकमेकांचा धर्म-जात-पंथाचा नेहमी आदर केला जातो. तेव्हा राज्य प्रगतीपथावर कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी जातीय सलोखा कायम ठेवावा. असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. 

पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजना आणि नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या माध्यमातून नाशिक (पूर्व) सार्वजनिक बांधकाम विभागाने येवला येथे उभारलेल्या 'शिवसृष्टी' प्रकल्पाचं भूमिपूजन व कोनशिला अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आ.किशोर दराडे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, श्री.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार व कार्याचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. शिवाजी महाराजांनी शेतकरी, कष्टकरी व रयतेचे स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या सोबत अठरापगड जाती व धर्माचे लोक होते. छत्रपतींच्या या मूल्यांवर राज्य सरकार कमी करतं आहे. येवला येथे साकारतं असलेली शिवसृष्टी भव्य-दिव्य झाली पाहिजे. शिवसृष्टी च्या माध्यमातून येवलाच्या पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगार  मिळणार आहे‌. त्यामुळे  'शिवसृष्टी'च्या कामात निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना आश्वसत केले.

करोनाच्या मागील दोन‌ वर्षाच्या काळात राज्य सरकारने अनेकांना संकटातून बाहेर काढण्याचे काम केले. विकासकामांना खीळ बसू दिली नाही.  राज्यातील जनतेला गॅस  सिलिंडर स्वस्तात मिळावा म्हणून टॅक्स कमी केला.असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यातील वातावरण ‌निकोप व शांततेचे असल्यावर परदेशातील उद्योजक त्या राज्यात गुंतवणूक करतात. आपल्याला राज्याचे वातावरण निकोप ठेवून विकासाकडे घेऊन जाययचे आहे. 'शिवसृष्टी' च्या माध्यमातून निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व पराक्रम , त्यांच्या सेनापती व मावळे यांच्या त्याग व निष्ठेचा इतिहास नवीन पिढीपुढे जाणार आहे. अशी आशा ही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केली.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test