सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहामध्ये भरतीसाठी १५ जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे :- सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहाकरिता अशासकीय कर्मचाऱ्यांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, इतर नागरिकांनी १५ जून पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज सादर करावेत.
पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये सहाय्यक वसतिगृह अधीक्षक ३ (पुरूष), मानधन १४ हजार ८५२ रुपये, स्वयंपाकी ९ (महिला) मानधन ८ हजार ९११ रुपये, सफाई कर्मचारी ३ (पुरूष), मानधन ७ हजार ९२१ रुपये, माळी १ (पुरूष) मानधन ४ हजार ९२० रुपये तसेच नवी पेठ येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहामध्ये सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका ३ (महिला), मानधन १४ हजार ८५२ रुपये, स्वयंपाकी ७ (महिला) मानधन ८ हजार ९११ रुपये, सफाई कर्मचारी २ (पुरूष), मानधन ७ हजार ९२१ रुपये, माळी १ (महिला) मानधन ४ हजार ९२० रुपये अशी पदे भरण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी ०२०-२६१२२२८७ या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर तसेच वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल (भ्र.ध्व. क्र. ७०२०४१०९५४) आणि वसतिगृह अधीक्षिका अनिता पाटेकर (भ्र.ध्व. क्र. ९४०४५८१९४७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (नि.) यांनी केले आहे.