करंजे गावात 'शिवसेना'शाखेची पाटी पूजन कार्यक्रम संपन्न...!
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे गाव येथे शिवसेनेचे रामटेक लोकसभा खासदार मा. कृपाल तुमाणे, शिवसेना शिव संपर्क अभियान अंतर्गत बुथप्रमुख, गटप्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी बारामती तालुक्यात संपर्क दौरा आयोजित केला होता ,
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करंजे गाव येथे 'शिवसेना' शाखेचे पाटीचे पूजन करुन गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्काराचा व चाहापणाचा कार्यक्रम झाला . यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले , तालुका प्रमुख विश्र्वास मांढरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश मदने, महिला आघाडी , तालुक्यातील शिवसैनिक नेते उपस्थित होते यावेळी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड, करंजे राष्ट्रवादीचे युवा नेते भाऊसाहेब हुंबरे, नवनियुक्त शाखा प्रमुख नागेश गायकवाड, संजय बोडरे ,करंजे पोलिस पाटील , पश्र्चिम विभाग केबल नेटवर्क चे प्रशांत जाधव व गावातील तरुण व नागरीक उपस्थित होते .