क्रिडा प्रबोधनीमध्ये कौशल्य चाचण्याद्वारे खेळाडूंना प्रवेश.
पुणे : राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे घडविण्यासाठी राज्यातील क्रिडा प्रबोधनीमध्ये कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी २४ व २५ मे रोजी सकाळी ९ वाजता बालेवाडी येथे खेळाडुंनी चाचण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा उपसंचालक प्रमोदिनी अमृतवाड यांनी केले आहे.
सरळ प्रवेश प्रक्रिये अंतर्गत क्रिडा प्रबोधनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेला खेळाडू वय १९ वर्षाच्या आतील आहे अशा खेळाडूंना सबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ज्ञ समिती समक्ष प्रवेश निश्चित केला जातो. क्रिडा प्रबोधनीमध्ये समाविष्ट खेळामध्ये कौशल्य चाचणीचे आयोजन करून गुणानुक्रमाने देण्यात येणार आहे.
अनिवासी प्रवेश प्रक्रियामध्ये अनिवासी क्रिडा प्रबोधनीमध्ये प्रवेशासाठी अधिकृत राज्य, राष्ट्रीय सात प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये आर्चरी,ज्युदो, हॅन्डबॉल अॅथलेटीक्स, बॉक्सींग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी, टेबल, वेटिलिप्टींग तसेच जिग्नॅटिक्स या खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. पात्र खेळाच्या पुणे विभागस्तरीय चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्युदो, आर्चरी, मैदानी, शुटींग, कुस्ती, टेबलटेनिस, बेटलिफ्टिंग, जिग्नॅटिक्स या खेळांसाठी शिवछत्रपती क्रिडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे २४ मे २०२२ रोजी व हॅन्डबॉल, बॉक्सिंग, बॅडमिंटन व हॉकी या खेळासाठी २५ मे रोजी सकाळी सकाळी ९ वाजता मुख्य मैदानात खेळाडुंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा उपसंचालक प्रमोदिनी अमृतवाड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते 9923902777 व क्रीडा मार्गदर्शक महेश चावले 9370324950, भैरवनाथ नाईकवडी 9284061779 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.