Type Here to Get Search Results !

अखेर बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून लाकडी निबोडी योजनेस मंजुरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

अखेर बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून लाकडी निबोडी योजनेस मंजुरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
इंदापूर - गेल्या पंचवीस वर्षापासून इंदापूर तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत चर्चेत येणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या ३४८.११ कोटी (रू. तीनशे अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाख फक्त) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा विषय होता.यासाठी भरणे यांनी कसोशीने प्रयत्न केले अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील १० गावांमधील ४३३७ हेक्टर क्षेत्र व बारामती तालुक्यातील ७ गावांमधील २९१३ हेक्टर क्षेत्र एकूण ७२५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे तालुक्यातील दुष्काळी गावातील जिरायती शेती बागायती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३४८ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि लोकप्रिय खा. सौ सुप्रिया सुळे यांचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आभार मानले आहेत.
लाकडी-निंबोडी ही योजना या परिसरासाठी महत्वाची आहे. ही योजना ३० वर्षांपासून रखडली होती. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची माहिती घेतली. तसेच ती पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. इंदापुर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न शासन दरबारी पोहोचवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही महिन्यात इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात या योजनेबाबत संकेत दिले होते. यासाठी प्राथमिक मंजुरी देखील घेण्याचे काम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
त्यानंतर आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही भीमा (उजनी) प्रकल्पाचाच भाग असल्याने सदर योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही असे कळविले आहे.त्यानुसार लाकडी निंबोडी उपसा सिंचन या योजनेस एकूण रु. ३४८.११ कोटी (रू. तीनशे अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाख फक्त) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अशी आहे योजना …

लाकडी निंबोडी योजनेचा भूमिपूजन शुभारंभ देशाचे नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते करणार असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले आहे. कुंभारगांव परिसरातून साधारण ७६५ हाँर्स पॉवर क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने हे पाणी उचलून शेटफळगडे आणि निरगुडे च्या सीमेवर टाकले जाईल. ६४० हॉर्स पॉवरचे ३ पंप व ५७० हॉर्स पॉवरचे दोन विद्युत पंप त्या ठिकाणी बसवले जातील. त्यामुळे या योजनेतून इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील ११ हजार एकर शेती ओलिताखाली येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test