बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे- राज्यमंत्री कु.अदिती तटकरे
पुणे :- महिलांनी बचत गटासाठी असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेऊन बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन राज्यमंत्री कु.अदिती तटकरे यांनी केले.
खेड तालुक्यातील मौजे वाघु येथे महिला बचत गट मेळाव्यात त्या त्या बोलत होत्या. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, निर्मला पानसरे, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, सरपंच सावळा भोईर आणि बचत गटातील महिला सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, बचत गटाद्वारे वस्तू उत्पादनासोबत सेवा देण्यातही बचत गट पुढे येत आहेत. महावितरणचे विद्युत देयके वाटपाचे कामही काही महिला बचत गट करत आहेत. विविध क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन गटांनी व्यवसाय करावा. शासकीय योजनांचा लाभ घेऊन व्यवसायाच्या विस्ताराकडे लक्ष द्यावे.
परिसरातील विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही देताना त्या म्हणाल्या, परिसरातील रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची करावीत. परिसरात जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर कामे पूर्ण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा.
यावेळी आमदार दिलीप मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले.