दोन (२) जून रोजी पेंशन अदालत
पुणे: राज्य शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता पुणे कोषागार कार्यालयामार्फत बै. जी. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालय येथील सभागृहात २ जून २०२२ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेमध्ये पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
या पेंशन अदालतीसाठी प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्कदारी), महाराष्ट्र १ मुंबई कार्यालयाचे अधिकारी निवृत्तीवेतन संबंधी समस्या आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त निवृत्तीवेतन धारकांनी या अदालतमध्ये सहभागी होऊन पेंशन संबंधी समस्या, अडचणी सोडविण्यासाठी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे वरिष्ठ कोषागार अधिकारी शेखर शेटे यांनी केले आहे.
*पेंशन धारकांसाठी विविध उपक्रम*
प्रधान महालेखाकर (लेखा व हक्कदारी) कार्यालयाने निवृत्तीवेतन धारकांच्या सोईकरिता अनेक उपक्रम राबविले आहेत.
साप्ताहिक ऑनलाईन पेंशन संवाद...
■ २४ तास उपलब्ध टोल फ्री क्र. १८००-२२ ००१४, ■ २४ बाय ७ व्हाइस मेल क्र. ०२०-७११७७७७५,
माहिती वाहिनी, पेंशन सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र, निवृत्तीवेतन धारकांकरिता समर्पित ई-मेल
■ 'helpdesk.mh1ae@cag.govin'
या उपक्रमांची माहिती या कार्यक्रमात देण्यात येईल, असेही श्री. शेटे यांनी कळवले आहे.