सत्यशोधक प्रतिष्ठान निमगाव केतकी यांच्या वतीने छत्रपती शाहूजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ-निमगाव केतकी तालुका इंदापूर या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू जी महाराज यांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्याचा कार्यक्रम सत्यशोधक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉक्टर स्वप्निल देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी सकाळी बरोबर 10 वाजता 100 सेकंद शांत उभा राहून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून करण्यात आलेल्या आव्हानाला साथ देत निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणून चेअरमन श्री तुषार (बाबा) जाधव माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे एडवोकेट सचिन राऊत एडवोकेट सुभाष भोंग ग्रामपंचायत सदस्य अनिल भोंग माजी ग्रामपंचायत सदस्य माणिक भोंग गोपाळ भोंग राऊत सर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील, महादेव पाटील मंगेश घाडगे पत्रकार नीलकंठ भोंग पप्पू मिसाळ महेश डोंगरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय मिसाळ सचिव प्रवीण डोंगरे कार्याध्यक्ष हनुमंत मिसाळ सदस्य सुमित मिसाळ यांनी केले होते.