मोरगाव ! तिर्थक्षेत्र मोरगाव येथे सोमवती अमावस्या निमित्त पालखी सोहळ्यास भावीकांनी गर्दी
मोरगाव :अष्टविनायक तिर्थक्षेत्र मोरगाव ता . बारामती येथे आज सोमवती अमावस्या निमित्ताने श्रींच्या पालखी सोहळ्यास भावीकांनी गर्दी केली होती. मोरया नावाचा जयघोष व तोफांची सलामी देत मयुरेश्वराचा पालखी सोहळा कऱ्हानदी किनारी स्नासाठी निघाला होता.
आज सोमवती अमावस्या निमित्ताने श्रींचा पालखी सोहळा अभ्यंग स्नासाठी कऱ्हा नदी काठी गेला होता. सकाळी नऊ वाजता मंदिर प्रदक्षिणा करून मुख्य बाजार पेठेतुन पालखी सोहळा कऱ्हा नदी काठी गेला. मोरया मोरयाचा जयघोष , तोफांची सलामी व सनईच्या मंगलमई सुरात हा पालखी सोहळा नदी किनारी गेला. या सोहळ्यासाठी खांदेकरी, मानकरी, गुरव , ब्राम्हण व शेकडो भावीक उपस्थित होते.
कऱ्हा नदी किनारी श्रींस जलस्नान घालण्यात आले. सध्या नदी पात्र पाण्या अभावी कोरडे ठणठणीत असल्याने गणेश कुंडामध्ये कृत्रीमरीत्या पाणी सोडण्यात आले होते. सोमवती निमित्ताने गणेश कुंड परीसरात स्वच्छता ग्रामपंचायतच्यावतीने ठेवण्यात आली असल्याची माहीती सरपंच निलेश केदारी यांनी दिली .सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान सोहळा मंदिरात आला यावेळी दही भाताने श्रींची दृष्ट काढण्यात आली. मंदिरात पालखी सोहळा येताच त्यांवर खारीक खोबरे, शेंगदाने , रेवडी ,साखर फुटाणे यांची उधळण केली हा प्रसाद जमा करण्यासाठी शेकडो भक्तांनी गर्दी केली होती. प्रसाद वाटप नंतर सोहळा संपन्न झाला