Type Here to Get Search Results !

पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल सात रुपयांनी स्वस्त..!

पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल सात रुपयांनी स्वस्त..!
इंधनदरवाढीने होरपळलेल्या वाहनधारकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, शनिवारी ही घोषणा केली. या सोबतच घरगुती गॅसचे एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. हजाराच्या घरात पोहोचलेला गॅस सिलिंडर आता उज्ज्वला योजनेंतर्गत दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे.
इंधनावरील अबकारी कर कमी केला जाणार आहे. अबकारी कर कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डीझेल स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपशासित राज्यांमध्ये याची अंमलबजावणी लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
देशभरात पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) महागाई विरोधात काँग्रेसने आंदोलन सुरु केले होते. सिलेंडर बाबतीतही मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. रशिया-युक्रेन युध्दा दरम्यान वाढलेल्या महागाईमुळे केंद्र सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. यावर आता हा निर्णय घेतला आहे.
गेल्या सात महिन्यातील हा दुसऱ्यांदा निर्णय घेतला आहे. समोर कोणत्याही निवडणुका नसताना हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलने किंमती शंभरच्या पुढे गेल्या होत्या. त्यामुळे देशातील महागाई वाढली होती. त्यामुळे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करण्यात आली होती.
LPG गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार
स्वयंकाप घरातील एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी ही घोषणा केलीय. हजाराच्या घरात पोहोचलेला गॅस सिलिंडर आता उज्ज्वला योजनेंतर्गत दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळं (Inflation) त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
इंधनावरील अबकारी कर कमी केला जाणार आहे. अबकारी कर कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डीझेल स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपशासित राज्यांमध्ये याची अंमलबजावणी लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरात पेट्रोल, डिझेल महागाई विरोधात काँग्रेसने आंदोलन सुरु केले होते. सिलेंडर बाबतीतही मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test