Type Here to Get Search Results !

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई....सराईत वाहन चोरटयाकडुन ४० मोटारसायकली केल्या जप्त

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई....
सराईत वाहन चोरटयाकडुन ४० मोटारसायकली केल्या जप्त.

पुणे ,मिळालेल्या माहितीनुसार  वाहन चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झालेली होती. त्यामध्ये मोटार सायकलींची चोरी हा महत्वाचा विषय आहे. शिकापुर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये गेल्या अनेक महीन्यांपासुन मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल होत होते. त्यामुळे  हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे तपास पथकाला विशेष मोहीम राबवुन मोटारसायकलींच्या चोरीला आळा घालणे बाबत सक्त आदेश दिले आदेशा प्रमाणे गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी वेळोवेळी साध्या  आठवडे बाजार तसेच वाहने पार्क करण्याची ठिकाणी सक्त पेट्रोलींग करीत होते.
दरम्यान दिनांक १६/०५/२०२२ रोजी शिकापुर पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील पो.ना.
/ विकास पाटील व पो.कॉ. / निखील रावडे यांना माहीती मिळाली की शिकापुर व तळेगाव ढमढेरे
परीसरात मोटारसायकल चोरी करणारा आरोपी हा कासारी फाटवाकडुन तळेगाव ढमढेरे गावाकडे जात
आहे. सदर बातमी बाबत त्यांनी गुन्हे तपास पथकाचे अधिकारी स.पो.नि. /  नितीन अतकरे यांना माहीती देवून पोलीस निरीक्षक श्री हेमंत शेडगे यांचे आदेशाने तपास पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला. त्यामध्ये संशईत आरोपी अक्षय अनिल काळे, वय २३ वर्षे, व्यवसाय बेकार, रा. बजरंगवाडी, शिक्रापुर, ता. शिरूर, जि. पुणे. मुळ रा. साईबाबा मंदिराजवळ, साईनाथ नगर, चिचोंडी पाटील, ता. जि.बअहमदनगर हा अलगद अडकला. त्यानंतर शिकापुर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मोटारसायकलींच्या चोरी वायत विचारपुस केली असता, त्याने शिक्रापुर व तळेगाव ढमढेरे गावात मोटार सायकलींची चोरी केल्याची कबुली दिली. नमुद आरोपी अक्षय अनिल काळे याचेकडुन आतापर्यंत एकुण ४० मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलीपैकी ३० गुन्हे उघडकीस आले असुन उर्वरीत मोटार सायकलमालकांची ओळख पटविणे चालु आहे. सदर आरोपी
अक्षय अनिल काळे हा सध्या शिकापुर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक ४८५ / २२ भा.द.वि.सं. कलम ३७९ या गुन्हयाचे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास  हेमंत शेडगे,
पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पो. ना. / अमोल दांडगे हे करीत आहेत. तसेच अटक आरोपीकडुन अजुनही मोटार सायकली हस्तगत करण्याचे कामकाज चालु आहे. सदरची कामगिरी ही मा.डॉ. अभिनव देशमुख सो पोलीस अधीक्षक, मा. मिलींद मोहीते सो अपर पोलीस अधीक्षक बारामती, मा. यशवंत गवारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यांचे मार्गदर्शनाखाली हेमंत शेडगे पोलीस निरीक्षक श्री नितीन अतकरे सहा पोलीस निरीक्षक यांचेसह सफी / जितेंद्र पानसरे,
पोहवा / किशोर तेलंग, अमोल चव्हाण, पोना/ विकास पाटील, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, सागर कोंढाळकर, रोहीदास पारखे, पोकों / जयराज देवकर, निखील रावडे, लखन शिरसकर व किशोर शिवणकर यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test