जागतिक परिचारिका दिन या ग्रामीण रुग्णालय साजरा..
इंदापूर - निमगाव केतकी येथील रुग्णालयामध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला यावेळी परिचारिका जीवाचे रान करून रुग्णांची सेवा करत असतात रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून ते आपल्या घरातील एक नातेवाईक असल्या सारखे रुग्णांची सेवा करत असतात आशा परिचारिकांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो अशा शब्दात डॉक्टर आरकिल्ले यांनी शुभेच्छा दिल्या सर्व परिचारिकांना गुलाब पुष्प व पाणी पिण्याच्या बाटल्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला फ्लोरेन्स नायटिन्गेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला.त्यांच्याच स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिनी जगभरात १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळीडॉ.अरविंद आरकिले, डॉ. प्रणाली जाधव, डॉ. रोहित जाधव, डॉ. सौरभ जाधव,डॉ. हर्षला गव्हाणे, अधिपरिचारिका शितल राऊत, तेजश्री बिचकुले, सारिका कोकणे, शेखर गणगे, जयकुमार राऊत, आप्पा राऊत, तसेच निमगांव केतकीगावातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण भोंग, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय राऊत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.