तरडोली येथे शिवजयंती व अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नेत्र तपासणी शिबीर संपन्न
तरडोली येथील पवारवाडी भोईटे वाडी येथे शिवजयंती व अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बुधराणी हॉस्पिटलचे नेत्र तज्ञ डॉक्टर गिरीश पाटील व आप्पा काळे,तरडोली गावचे सरपंच सौ.विद्या भापकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबीरास प्रारंभ झाला गावातील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिरात लाभ घेतला
या कार्यक्रमावेळी तसेच हणमंत भापकर,मंगेश खताळ,मोहन पवार, सुरज भोईटे,संतोष चौधरी,दत्तात्रय निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते
गावातील नागरीकांनी आयोजकांचे आभार मानले