सोमेश्वरनगर ! करंजेपूल येथे रमजान ईद उत्साहात साजरी
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे रमजान ईद निमित्त मंगळावर 3 रोजी सकाळी 9 वाजता करंजेपूल मुस्लिम बांधवांनी मज्जित या ठिकाणी नमाज पठण केले.
करंजेपुल येथील मुस्लिम बांधवाच्या कुटूंबाला मज्जिद याठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी प्रत्येकी पाच किलो साखर देत त्यांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या यावेळी करंजेपुल माजी उपसरपंच निलेश गायकवाड ,युवा नेते सागर गायकवाड सुहास गायकवाड तसेच मुस्लिम बांधव करंजेपुल मज्जित अध्यक्ष व करंजेपूल ग्रामपंचायत सदस्य लतीफ मुलानी, उपाध्यक्ष रसिक शेख व करंजेपुल येथील सर्व मुस्लीम बांधव उपस्थित होते