खेलो इंडिया युथ गेम्स;देशभरातील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन
पुणे : २०१७-१८ साली सुरू झालेल्या खेलो इंडिया मुळे देशभरातील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आहे. या स्पर्धेत गेली तीन वर्षे महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. या वर्षी ही महाराष्ट्र शासन सर्व खेळाडूंमागे तितकीच मेहनत घेत आहे. त्यासाठी खेलो इंडिया २०२२ या हरियाणा मध्ये होणाऱ्या स्पर्धेआधी बालेवाडी पुणे येथे सर्व संघाचे प्रशिक्षण शिबीर २१ मे २०२२ ते ३१ मे २०२२ पर्यंत आयोजित केले आहे. सर्व संघांना नियोजित वेळापत्रक आखून तारीख आणि वेळ देण्यात आली आहे. यात खो खो, मल्लखांब, कबड्डी, कुस्ती हे महाराष्ट्राच्या मातीतील खेळ राज्याचे नाव उंचावतील याची राज्य शासनाला खात्री आहे