शिरूर ! महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शिरूर येथील भूषण विजय कडेकर यांचा सन्मान.
शिरूर - पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील पत्रकार भूषण विजय कडेकर हे गेल्या तीन वर्षापासून "कामगार नामा" माध्यमातून www.kamgarnama.com या ऑनलाईन न्यूज पोर्टलद्वारे संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध समस्या, हक्क, अधिकार, कर्तव्य व कार्य याबाबत जनजागृती करून समस्त कामगार वर्गाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या बहुमूल्य अशा कार्याबद्दल
दि.१ मे २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.श्री.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या हस्ते व शिरूर आमदार मा.श्री.अशोकबाप्पू पवार, जुन्नर आमदार मा.श्री.अतुलशेठ बेनके, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ अध्यक्ष मा.श्री.किशोरजी ढोकले यांच्या उपस्थितीत सणसवाडी पुणे येथील 'जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त झालेल्या कामगार मेळावा यामध्ये "कै.भाई वैद्य स्मृती पुरस्कार २०२२"या सन्मानाने गौरवण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग उपस्थित होता.
त्याचबरोबर मोशी,पुणे येथे श्रमिक एकता महासंघ यांच्या द्वारे आयोजित कामगार मेळावा यामध्ये Industry All Global Union चे मा.श्री.प्रविण राव यांच्या हस्ते व श्रमिक एकता महासंघ अध्यक्ष मा.श्री.दिलीपरावजी पवार, सल्लागार मा.श्री.मारोतीराव जगदाळे, मा.उपमहापौर मा.श्री. केशवजी घोळवे यांच्या उपस्थितीमध्ये 'विशेष कार्याबद्दल सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग उपस्थित होता.