अंकिता पाटील ठाकरे यांनी केले आर्या तावरे यांचे अभिनंदन
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय भाषण जगाभरात नावजलेल्या "फोर्ब्स" मासिकांमध्ये युरोपातील आर्थिक क्षेत्रातील ३० वर्षाखालील ३० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये कु. आर्या कल्याण तावरे यांनी आपले स्थान मिळवले आहे. याबद्दल आर्या यांचे पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत आर्या चे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कु. आर्या कल्याण तावरे यांनी अवघ्या २०-२१ व्या वर्षी फ्यूचरब्रीक्स स्टार्टअप सुरु करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल पुरवठा करणारा हा स्टार्टअप आहे. फ्यूचरब्रीक्स या त्या स्टार्टअपचे आजचे बाजारमुल्य ३२.७ कोटी पौंड इतके असून आज फ्यूचरब्रीक्स २२ वेगवेगवेळ्या बांधकाम प्रकल्पावर काम करीत आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक करण ग्रुप प्रोमोटर्स अँड बिल्डरस चे संस्थापक श्री.कल्याण तावरे यांच्या त्या कन्या आहेत. अंकिता पाटील ठाकरे व आर्य तावरे यांची काही दिवसांपूर्वी पुणे येथे भेट झाली होती त्या वेळेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत अंकिता पाटील ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. अंकिता पाटील ठाकरे सातत्याने युवकांना विविध माध्यमातून स्टार्टअप सुरू करण्याकरिता मदत करत आहेत व त्यांना प्रोत्साहित करत आहे.