Type Here to Get Search Results !

तरडोलीच्या सरपंचपदी विद्या भापकर कायम...

तरडोलीच्या सरपंचपदी विद्या भापकर कायम...
 
सोमेश्वरनगर - तरडोली (ता.बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची ९ डिसेंबर २०२१ व १० डिसेंबर २०२१ रोजी झालेली निवडणुक प्रक्रिया कायदेशीर बाबींचा विचार न करता चुकीच्या पद्धतीने घेतल्याचा आरोप करत पाच सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुक
प्रक्रियेतील दोन्ही बाजुची वस्तुस्थिती पाहून अर्जदारांचा अर्ज फेटाळत
निवडणुक प्रक्रिया कायदेशीरपणे झाल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे तरडोलीच्या सरपंच विद्या भापकर यांचे सरपंचपद अबाधित राहीले आहे. वास्तविक,येथील सरपंच पदाची निवडणुक अतिशय नाट्यमय पद्धतीने झाली. पंचवार्षिक निवडणुकीनंतर २५ फेब्रुवारी २०२१ झालेल्या सरपंच निवडणुकीसाठी
 विद्या भापकर व नवनाथ जगदाळे निवडणुकीच्या रिंगणात होते. भापकर गटाकडे पाच मतांचे बहुमत असूनही दोन मते निवडप्रक्रियेत बाद ठरविल्यामुळे चार मतांचे अल्पमत असलेल्या नवनाथ जगदाळेंच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली.
मात्र, ही निवडप्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा करत पाच
सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. यामध्ये निवडप्रक्रियेतील
वस्तुस्थिती पाहून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुश यांनी सरपंच निवड रद्द
करत  सरपंच निवडणुक परत घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार ९ डिसेंबर २०२१ रोजी सरपंच निवडणुक घेण्यात आली. दरम्यान, गावातील राजकीय घडामोडींमुळे भापकर गट अल्पमतात तर जगदाळे गट बहुमतात गेला. मात्र, सरपंच निवडणुकीसाठी विद्या भापकर यांचा एकमेव अर्ज दिलेल्या वेळेत दाखल झाला. यावेळी चार सदस्य उपस्थित होते, तर पाच सदस्य गैरहजर होते. निवडणुक निर्णय अधिकारी
धनसिंग कोरपड यांनी अर्ज घेणे, छाननी, माघार या प्रक्रिया नियमानुसार केल्या यात भापकर यांचा एकमेव अर्ज होता. मात्र, सरपंच निवडीच्या सभेसाठी आवश्यक असलेला कोरम पुर्ण नसल्यामुळे नियमानुसार सभा तहकूब करण्यात आली. दुसऱ्या दिवशी १० डिसेंबर २०२१ रोजी ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य उपस्थित होते. मात्र,निवडणुक निर्णय अधिकारी यांनी नियमानुसार सभा तहकूब झालेल्या वेळेपासून पुढे
सभेचे कामकाज सुरू केले आणि तहकूब सभेसाठी गणपुर्तीची आवश्यकता नसल्याने सरपंच पदासाठी अर्ज आलेल्या विद्या भापकर यांना सरपंच म्हणून घोषित केले.
कायदेशीर नियमांच्या तरतुदीमुळे अल्पमतात असूनही भापकर यांना सरपंच पदाचा मान मिळाला. दरम्यान, बहुमत असलेल्या गटाचे अपील फेटाळत जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच निवड कायदेशीरपणे झाल्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, सरपंच निवड मान्य नसल्याचा दावा करत उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जगदाळे, सागर जाधव, अश्विनी गाडे, अनिता पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. मात्र, निवडणुक निर्णय अधिकारी धनसिंग कोरपड व सरपंच विद्या भापकर यांच्या बाजुने ॲड. हेमंत भांड पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ व महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच निवडणुक)नियम १९६४ मधील तरतुदीनुसार लेखी व तोंडी युक्तीवाद करत ही निवड प्रक्रिया कायदेशीरपणे झाल्याचे सिद्ध केले त्यामुळे वरील आदेश पारित करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test