विकासपर्व काय असते ते पहायला मिळाले !
'दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची' प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, दि. २: 'विकासपर्व काय असते ते पहायला मिळाले. अतिशय सुंदर, सुरेख, सर्वसामान्य जनतेला समजेल असे मुद्दे पहावयास मिळाले !', 'प्रत्येक घटकासाठी शासन म्हणून केलेले काम अभिमानास्पद आहे.', 'अप्रतिम, खूपच सुंदर एक नवीन अनुभव!' अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्या विभागीय माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या 'दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची' या सचित्र प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांकडून.
जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती व जनसंपर्क विभागाअंतर्गत विभागीय माहिती कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजना व विकासाकामांवर आधारित चित्रमय प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. प्रदर्शनाला सर्वच घटकातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. लोकप्रतिनिधी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, निवृत्त शासकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, लहान बालके आदी सर्वांनीच प्रदर्शनाला भेट देऊन शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. आबालवृद्धांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली आहे. हे प्रदर्शन ५ मेपर्यंत सुरू राहणार आहे.
या सरकारने केलेले काम पाहून मला फार आनंद होतो. सरकारने सर्व नागरिकांना या दोन वर्षात खूप कामे करून दाखवली आहेत. मला या सरकारचा खूप अभिमान आहे. सरकारला खूप शुभेच्छा! अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महादेव व्यवहारे यांनी. तर हवेली तालुक्यातील कोलवडी येथील बाळासाहेब आळंदकर म्हणतात, शासनाने दोन वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रदर्शनातून उत्कृष्टपणे झाल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले
*निवृत्त माहिती संचालक श्रद्धा बेलसरे यांची भेट*
निवृत्त माहिती संचालक श्रद्धा बेलसरे यांनी पतीसह प्रदर्शनाला भेट घेऊन उपक्रमाचे कौतुक केले. शासनाने केलेल्या कामाची चांगली माहिती दिली आहे. एकूण सर्व भव्य प्रमाणात सुरू आहे, असे त्या म्हणाल्या. अतिशय कल्पकपणे सादर केलेली शासकीय उपलब्धीची माहिती प्रसन्न करते. सुबकपणे तयार केलेले कॉर्पोरेट दर्जाचे आकर्षक प्रदर्शन पाहून आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास बेलसरे यांनी व्यक्त केली.
सरकारने २ वर्षात केलेल्या विकास कामांवर आधारित सचित्र प्रदर्शनातून योजनांची माहिती मिळत आहे. सरकारने हाती घेतलेले विविध उपक्रम सर्वच घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयोगी पडणारे आहेत!' अशी प्रतिक्रिया कुणाल महाडिक यांनी व्यक्त केली आहे.
प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत असून असून त्यात, दोन वर्षात कोरोनाचा कठीण काळ असूनही शासनाने खूप विकासकामे केली आहेत हे प्रदर्शनातून दाखवण्यात आले; सामान्य जनतेला या प्रदर्शनातील माहीतीचा लाभ होईल आदींचा समावेश आहे.
*भावी अधिकाऱ्यांनी दिली भेट*
राज्य सेवा परीक्षेतून अधिकारीपदी निवड झालेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन योजनांची बारकाईने माहिती घेतली. शासकीय सेवेतील भावी कामगिरीसाठी या प्रदर्शनातील योजना मार्गदर्शक ठरतील, अशी प्रतिक्रिया एका भावी अधिकाऱ्याने व्यक्त केली.
*दिव्यांग अमित जोशी यांनी प्रदर्शनाला दिली दाद*
विशेष म्हणजे अमित विलास जोशी या युवकाने ऐकू आणि बोलता येत नसतानाही सर्व प्रदर्शन व्यवस्थितरित्या पाहून सांकेतिक भाषेतून प्रदर्शन खूप माहितीपूर्ण आणि छान असल्याचा अभिप्राय व्यक्त केला.