Type Here to Get Search Results !

निमगाव केतकी याठिकाणी सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने बौद्ध जयंती संपन्न

निमगाव केतकी याठिकाणी सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने बौद्ध जयंती संपन्न
निमगाव केतकी या ठिकाणी सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने श्री संत सावता माळी चौक या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बुद्धांचे विचार ज्या देशाने स्वीकारले तो देश प्रगतीच्या मार्गावर ती आहे बौद्ध धर्म हा जगातील अनेक देशांमध्ये आहे भारताने बुद्ध स्वीकारल्यास भारत देश महासत्ता होईल असे वक्तव्य श्री संजय राऊत सर यांनी केले.  कार्यक्रम हा सत्यशोधक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉक्टर स्वप्नील देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी संजय राऊत सर व राऊत मॅडम यांच्याकडून सत्यशोधक प्रतिष्ठान यांना गौतम बुद्धांच्या प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणून बहुजन मुक्ती पार्टी चे बाबासाहेब भोंग  तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अतुल (आप्पा) मिसाळ बालाजी पतसंस्थेचे चेअरमन तात्यासाहेब वडापुरे पैलवान शिवाजी भोंग  पैलवान संतोष मिसाळ सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत राजू जठार दादासाहेब आदलिंग मंगेश घाडगे पक्षी मित्र धनंजय राऊत सामाजिक कार्यकर्त्या राऊत मॅडम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय मिसाळ सचिव प्रवीण डोंगरे पत्रकार निलेश भोंग यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test