पदवीच्या प्रथम वर्गापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी - प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालयात, स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत दि 2 मे 2022 रोजी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे यांनी परीक्षेची तयारी कशी करावी यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना पदवीच्या प्रथम वर्गापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असे मत व्यक्त केले. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ग्रामीण भागातील विशेषतः गरीबी कुटुंबातील मुळेच यशस्वी होतांना दिसून येतात. असे मत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी पदवीच्या प्रथम वर्गापासून च स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे संगणक शाखेचे उपप्राचार्य प्रा. आर .डी .गायकवाड केले तर प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा केंद्रांचे समन्वयक डॉ नारायण राजूरवार यांनी केले तर आभार प्रा.रजनीकांत गायकवाड केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .जे.एम .साळवे, डॉ जया कदम ,डॉ प्रवीण ताटे देशमुख तसेच महाविद्यालयाच्या न्याकचे समन्वयक डॉ संजू जाधव, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते