२९ मे रोजी बारामतीत काय बोलणार आमदार पडळकर ...!
बारामती - पुण्यश्लोक बारामती अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निम्मित ढेकळवाडी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बहुजनांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर व समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे यशवंत ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष बापुराव सोनवलकर, संपतराव टकले, वसंतराव घुले यांनी सांगितले. गेली दोन वर्ष कोरोणामुळे जयंती होऊ शकली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी मोठ्या उत्साहात जयंती साजरी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथे रविवार दि २९ मे रोजी सायं ६ वाजता अहिल्यादेवी जयंतीचे औचित्य साधून बहुजन मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.