लोणंद ! पुनम ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न.
लोणंद - आयबीजेएचे राज्य समन्वयक तसेच बारामती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांच्या पूनम ज्वेलर्स के एम आळंदीकर या लोणंद येथील सोन्या चांदीच्या शोरूमचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.
या वेळेस विधानसभेचे सभापती रामराजे नाईक तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील आमदार मकरंद पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, एसटी महामंडळ पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड, सराफ संघटनेचे पदाधिकारी रघुनाथ बेडगे ,सुधीर पोतदार , अशोक कुलथे यांच्यासह अमृतराज मालेगावकर, संतोष बागडे अभिषेक बागडे सोमेश्वर कारखान्याची उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती बँकेचे संचालक रणजितकुमार सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, मा. कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड, सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे संचालक संग्राम सोरटे,प्रणाली शिक्षण संस्था अध्यक्ष बुवासाहेब हुंंबरे
यांच्यासह नगराध्यक्षा माधुरी गालिंदे उपनगराध्यक्ष शिवाजीराव पाटील डॉ नितीन सावंत इत्यादी पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी यांच्यासह सातारा जिल्ह्यांतील पदाधिकारी बारामती तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार उद्घाटन म्हणाले की किरण आळंदीकर यांची पुणे जिल्ह्याच्या बाहेरची पहिली शाखा असून त्यांनी बारामती तालुक्यात आपलं विश्वास आणि सचोटीच्या बळावर असंख्य ग्राहक जोडले आहेत. आता लोणंद मध्येदेखील त्यांचा विश्वास आणि सचोटीचे ग्राहकांना सेवा देतील. तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की बारामती म्हणजे चोख सोने त्यामुळे किरण आळंदीकर यांनादेखील त्यांचे के एम आळंदीकर सराफ पिढीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल.
आळंदीकर परिवाराच्या वतीने किरण आळंदीकर संगीता आळंदीकर शुभम आळंदीकर ऐश्वर्या आळंदीकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजेंद्र मुसळे यांनी केले.