Type Here to Get Search Results !

इंदापूर ! इंदापूर तालुक्यासाठी दत्तामामा भरणे यांनी आणले 8 कोटी 57 लाख रुपये

इंदापूर ! इंदापूर तालुक्यासाठी दत्तामामा भरणे यांनी आणले 8 कोटी 57 लाख रुपये
इंदापूर -  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणत विकास निधी खेचून आनत असून कोट्यावधींच्या विकास कामांचा त्यांनी तालुक्यात धडाकाच लावला आहे.भरणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 8 कोटी 57 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
नागरी सुविधाममधून 1कोटी 57 लाख, लेखाशीर्ष 3054 गट ब व क मधून दोन रस्त्यांकरिता 2 कोटी तर 2515 योजनेतून 5 कोटी रुपये असा एकूण निधी 8 कोटी 57 लाख रूपयांचा निधी इंदापूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
सणसर येथील समर्थ नगर थोरात घर रस्ता करणे ६  लक्ष, अंथुर्ण शिंदे मळा अंतर्गत रस्ता करणे १५ लक्ष,अंथुर्णे येथील ४८ फाटा ते दळवी वस्ती रस्ता करणे २० लक्ष,काटी येथील प्राथमिक शाळा ते महादेव मंदिर रस्ता करणे १० लक्ष,लासुर्णे येथील ग्रा.पं.लासुर्ण ते माळी मळा रस्ता करणे १० लक्ष,बिजवडी येथील काळेल वस्ती अंतर्गत रस्ता करणे १० लक्ष,बेलवाडी येथील कुंभारवस्ती रस्ता करणे १० लक्ष,लासुर्णे अंतर्गत बंदिस्त गटार १० लक्ष,सणसर येथील शब्बीर काझी यांचे घराकडे जाणारा रस्ता १० लक्ष,अंथुर्णे आण्णाभाऊ साठेनगर येथे रस्ता करणे ५ लक्ष,बावडा येथील जाकीर शेख वस्ती रस्ता करणे ५ लक्ष,निमसाखर येथील पिरवाडी अंतर्गत रस्ता करणे १० लक्ष,सणसर येथील समर्थ नगर रस्ता करणे ८ लक्ष व साईनगर अंतर्गत रस्ता करणे ८ लक्ष आणि भाग्यनगर अंतर्गत बंदिस्त गटार करणे ५ लक्ष व अंतर्गत रस्ता करणे १५ लक्ष अशी एकूण नागरी सुविधा मधून 1 कोटी 57 लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. लेखाशीर्ष 3054 गट ब व क मधून दोन रस्त्यांकरिता 2 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.यामध्ये राज्य मार्ग १२१ सणसर ते रायतेमळा खटकेवस्ती ते सणसर रस्ता करिता १ कोटी ४० लक्ष व डिकसळ ते योगेश्वरी लिफ्ट दशक्रिया विधी घाट रस्ता रुपये ६० लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
2515 योजनेतून खालील गावांसाठी 5 कोटी रुपये मंजूर पोंधवडी १० लक्ष,बेलवाडी ३० लक्ष,जाधववाडी १० लक्ष,डाळज नं २ - १० लक्ष,रणगाव १० लक्ष, शिरसाटवाडी ५ लक्ष,हगारेवाडी १० लक्ष,निरवांगी  २५ लक्ष,जाचकवस्ती ८ लक्ष,कुरवली १६ लक्ष, पिंपरी बु. १० लक्ष,मदनवाडी ३० लक्ष,बावडा २० लक्ष,शिंदेवाडी १० लक्ष,पंधारवाडी ३० लक्ष,निमसाखर २५ लक्ष,पळसदेव २० लक्ष,निरगुडे २० लक्ष,म्हसोबाचीवाडी २० लक्ष,भावडी १६ लक्ष,अगोती नं.१ - २० लक्ष,वरकुटे बु.३५ लक्ष,करेवाडी ३० लक्ष,कालठण नं.१ - २० लक्ष,भिगवण २० लक्ष,लाकडी १० लक्ष,तक्रारवाडी १० लक्ष,झगडेवाडी १० लक्ष आणि गोखळी १० लक्ष असा एकूण ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test