...एका व्यापाऱ्यांस १०२ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) घेण्याऱ्या अटक
मुंबई :- महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागाने जवळपास १०२ कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपुट टैक्स क्रेडिट (ITC) घेऊन शासनाच्या १४ कोटींच्या कर महसुलाची हानी करण्या-या व्यक्तीस अटक केली आहे.
मे. समिक्स पुरवठादार व्यापा-यांकडून रु.८ कोटींचा महसुल मिळविण्यात महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागास यश आले आहे.
मे. समिक्स विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमे अंतर्गत मे. समिक्स या कंपनीचे प्रोप्रायटर यांस ०7 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली. ह्या प्रकरणाबाबतचा तपास सुरु आहे.
महानगर दंडाधिका-यांनी या व्यापा-यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही धडक कारवाई सहाय्यक राज्यकर आयुक्त श्री. अमोल सुर्यवंशी यांनी श्री. निळकंठ एस. घोगरे, राज्यकर उपआयुक्त व
श्री. राहुल व्दिवेदी (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण अ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधानांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तु
व सेवाकर विभाग कर चुकवणा-या व्यापा-यांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणा-यांना कडक इशारा दिलेला आहे.