Type Here to Get Search Results !

बारामती ! बारामती तालुका पोलीसांची धडाकेबाज कामगिरी:अपहरण करून खुणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद

बारामती तालुका पोलीसांची धडाकेबाज कामगिरी:अपहरण करून खुणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद l


   अपहरण करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर हकीकत अशी की,  दिनांक 21/3/2022 रोजी सायंकाळी 19.30 वा चे सुमारास तक्रारदार नितीन बाळासाहेब कदम रा. वेणेगाव टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर  यांचा मनोज मुळे रा. टेंभुर्णी ता.माढा जि. सोलापूर यांचे बरोबर स्कॉर्पिओ गाडी विक्रीचा व्यवहार झाला होता . पैसे पूर्ण न मिळाल्याने तक्रारदार हे टी.टी.फॉर्मवर सह्या देत नव्हते म्हणून मुळे व त्याचे साथीदार 1) अविष्कार दळवी 2) आदनान देशमुख 3) अंकुश उर्फ बालाजी जाधव 4) दत्ता सपाटे 5) रत्नदीप पुजारी सर्व रा. करमाळा जि. सोलापूर यांनी करमाळा येथून स्कॉर्पिओ गाडीत बारामती येथे येऊन नितीन कदम यांना जिम मधून जबरदस्तीने बाहेर काढून स्कॉर्पिओ गाडीत बसवून त्यांचे अपहरण करून मारहाण करीत करमाळा येथे घेऊन गेले त्यानंतर ते सह्या करीत नाही म्हणून त्याचे डोक्यामध्ये टामीने मारले. त्यांचा गळा दोरीने आवळला व ते बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना माळशेज घाट ठाणे येथे रस्त्याच्या कडेला फेकून दिले. अशा आशयाची तक्रार बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाल्याने गुन्हा रजि.नंबर 173 / 22 भा .द .वि कलम 364, 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास म.सहा.पोलीस निरीक्षक शेंडगे मॅडम या करीत आहेत.

सदरचा गुन्हा खूपच गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्यास मा. पोलीस निरीक्षक महेश ढवाण सो बारामती तालुका पोलीस स्टेशन यांना सांगितले त्या अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक यांना योग्य ते मार्गदर्शन व सूचना देऊन आरोपींचा शोध घेण्यास पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण सो यांनी रवाना केले.

 सदरची टीम मा. पोलीस अधीक्षक श्री अभिनव जी देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद जी मोहिते सो बारामती .

उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेशजी इंगळे सो बारामती विभाग . मा. श्री महेश ढवाण पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शोध पथक बारामती तालुका पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार राम कानगुडे पोलीस नाईक  रणजीत मुळीक, अमोल नरुटे,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, नितीन कांबळे, महेश कळसाईत हे तपास करीत असताना  आरोपींचे नाव पत्ते माहित नसताना देखील मोठ्या शिताफीने आरोपींचा शोध घेऊन त्यांना दिनांक 31/3/2022 रोजी ताब्यात घेतले. तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH.45.AL.0552 ही देखील हस्तगत करून जप्त केली आहे. सदरचे आरोपी यांना दिनांक 5/4/2022  पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मिळाले आहे. पुढील तपास मा. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे मॅडम करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test