सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, करंजेपूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. शाळेय विद्यार्थिनी भार्गवी थोरात हिने मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमासाठी करंजेपूल गावचे सरपंच वैभव गायकवाड ,करंजेपूल शाळेतील शिक्षक येवले सर, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती विरकर मॅडम, शिंदे मॅडम,भापकर मॅडम आणि शाळेचे सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.